सिद्धूवर राजद्रोहाचा खटला दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
पंजाबचे पर्यटनमंत्री व माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धूने पुलवामा हल्ल्यानंतर "दहशतवाद हा एका धर्माचा किंवा देशाचा नसतो" असे वक्तव्य करून पाकड्यांची तळी उचलून धरल्याने टीकेचे धनी झाले.

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांची गळाभेट घेणारे पंजाब सरकारचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू याच्यावर बिहारमधील मुझफ्फरपूरच्या न्यायालयात राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला आहे. सिद्धूच्या गळाभेटीमुळे देशभरात संताप व्यक्त होत आहे. हिंदुस्थानात दहशतवादी कारवाया करणाऱया पाकिस्तान लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांची गळाभेट घेणाऱ्या सिद्धूवर राजद्रोहाचा खटला भरावा अशी याचिका मुझफ्फरपूरच्या कोर्टात एका वकिलाने दाखल केली आहे.

सिद्धूकडून समर्थन
गळाभेटीचे सिद्धू याने समर्थन केले आहे. कोणी यजमान पाहुण्यांची गळाभेट घेत असेल तर हा गुन्हा नाही. पाकिस्तान भेटीत मला तेथील लोकांचे खूप प्रेम मिळाले. इम्रान यांच्याशी भेट झाल्यानंतर हिंदुस्थानींच्या भावना त्यांना सांगितल्या असे सिद्धू म्हणाला.

summery- sedition case against navjyot singh siddhu