पंजाब मधील धरमपूर गावत एक भयंकर घटना घडली आहे. एका मुलानं आपल्या आईला परपुरूषासोबत बघितल्यानंतर संतापून त्या व्यक्तीचं गुप्तांग छाटलं आहे. याप्रकरणी त्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांकडून पुढील तापास केला जात आहे.
सदर घटना सोमवारी रात्री घडल्याचं बोललं जात आहे. विक्रमसिंग असं या आरोपी मुलाचं नाव आहे. विक्रमसिंगला सोमवारी रात्री उशिरा घरी त्याची आई एका परपुरूषासोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसली. आपल्या आईला अशा अवस्थेत पाहून त्याला राग अनावर झाला. त्यामुळे विक्रमसिंगनं रागाच्या भरात त्या व्यक्तीवर कुऱ्हाडीनं वार करून त्याचं गुप्तांग कापून टाकलं. त्यामुळे तो व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.
Shocking Incident: After finding his mother in an objectionable situation with another man at their home late at night, a son, in a fit of rage, attacked the man with an axe, cutting his private part and legs. A case has been registered, and the injured man has been admitted to… pic.twitter.com/KhIgeblepN
— Gagandeep Singh (@Gagan4344) June 17, 2024
मंगळवारी सकाळी या घटनेची माहिती आम्हाला मिळाली असल्याचं पोलिसांनी सांगितलं. आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा एक व्यक्ती बेशुद्ध आणि रक्तबंबाळ अवस्थेत घरात पडून होता. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याची परिस्थिती सध्या गंभीर असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.