सेहवाग, गंभीर डीडीसीएच्या समितीमध्ये सदस्य; हितसंबंधांचा प्रश्न

11

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली 

टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि तंत्रशुद्ध सलामीवीर गौतम गंभीर या क्रिकेटपटूंचा दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. सेहवाग व गंभीरशिवाय या समितीमध्ये आकाश चोप्रा आणि राहुल संघवी यांचाही समावेश करण्यात आला आहे. समितीचे सदस्य या नात्याने नवनियुक्त सभासदांना प्रशिक्षण आणि खेळाशी संबंधित अनेक अधिकार असणार आहेत. हेच अधिकार कळीचा मुद्दा ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. ‘डीडीसीए’ अध्यक्ष रजत शर्मा यांनी या नियुक्त्या लोढा समितीच्या शिफारशींनी झाल्याचे सांगितले आहे. मात्र हितसंबंधांमध्ये संघर्ष होण्याच्या दृष्टीने या नियुक्त्यांवर प्रश्न उभे राहण्यास सुरुवात झाली आहे. गंभीरने अजून निवृत्ती घोषित केलेली नाही. त्यामुळे त्याची निवड करणार्‍या निकड समितीच्या सदस्यांची निवड तो कशी करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या