स्त्रियांना ‘सेल्फी डिसमॉर्फिया’ने ग्रासले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

समुद्र असो की उंच टेकडी, सेल्फी तो बनता है असे म्हणत जिवाशी दोन हात करायलाही मागेपुढे पाहिले जात नाही. आपण सेल्फीत कसे दिसतो, कसे दिसायला हवे या वेडाने तर अनेकांना पछाडलेय. चांगला सेल्फी येण्यासाठी चक्क चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करण्यापर्यंत मजल गेली असून असे करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. या वेडापायी महिला असो वा पुरुष यामध्ये नैराश्याचे प्रमाण वाढत असून 74 टक्के स्त्रियांनी यामुळे आपला आत्मविश्वास गमावल्याचे एका सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे.

सेल्फीच्या वेडापायी मानसिकतेवर होणाऱ्यादुष्परिणामांबाबत ‘एस्थेटिक्स क्लिनिक’ या संस्थेकडून मुंबई, हैदराबाद, दिल्ली, कोलकाता या शहरांतील रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. सेल्फी चांगला यावा म्हणून शस्त्रक्रिया करण्यासाठी आलेल्या 300 व्यक्तींचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये 18 ते 40 वयोगटातील व्यक्तींचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये सर्वाधिक संख्या ही 23 वर्षीय तरुण-तरुणींची होती. यातील बहुतांश हे फेसबुक आणि इन्ट्राग्रामवर ऑक्टिव्ह होते. सेल्फी काढण्यापूर्वी आणि सेल्फी काढल्यानंतर या व्यक्तींच्या मानसिकतेवर होणाऱ्यापरिणामांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये बहुतांशी रुग्णांना ‘सेल्फी डिसमॉर्फिया’ने ग्रासले असल्याचे स्पष्ट झाले. 16 ते 25 या कयोगटातील स्त्राr-पुरुष आठकड्याला पाच तासांपर्यंतचा केळ सेल्फी काढण्यात आणि ते त्यांच्या पर्सनल प्रोफाइलकर अपलोड करण्यात घालवत असल्याचेही यातून उघड झाले आहे.

सेल्फी नीट येत नाही म्हणून चिंता
सेल्फी नीट येत नाही या चिंतेने 70 टक्के लोकांना ग्रासले आहे. यामध्ये 63 टक्के प्रमाण हे पुरुषांचे आहे, तर 75 टक्के महिलांना आपला सेल्फी नीटच येत नाही असे वाटत आहे. यामुळे 74 टक्के महिलांनी तर आपला आत्मविश्वासच गमावला आहे. यामुळे 62 टक्के पुरुषांना तर 74 टक्के स्त्रियांना कॉस्मेटिक सर्जरी करावीशी वाटत असल्याचे या अभ्यासात स्पष्ट झाले.

लोक कॉस्मेटिक सर्जरीच्या आहारी जातील
सेल्फी काढण्याच्या तसेच सोशल मीडियावर पोस्ट करण्याच्या कृतीमुळे लोकामध्ये आपल्या दिसण्याबद्दल अपूर्णत्वाची भावना निर्माण होते. कॉस्मेटिक सर्जरी केल्यामुळेच आपण व्यवस्थित दिसू असे त्यांना वाटू लागते. यामुळे नकारात्मकता निर्माण होऊन ते ‘सेल्फी डिसमॉर्फिया’च्या आहारी जातात. यावर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर अमेरिकेतील कॅलिफोर्नियाप्रमाणे हिंदुस्थानातही बहुतांशी लोक कॉस्मेटिक सर्जरीच्या आहारी जातील अशी भीती ‘एस्थेटिक क्लिनिक’चे संचालक डॉ. देबराज शोम यांनी व्यक्त केली.

दिल्लीपाठोपाठ मुंबईचा क्रमांक
‘सेल्फी डिसमॉर्फिया’मध्ये दिल्ली आघाडीवर आहे. दिल्लीपाठोपाठ मुंबईत 63 टक्के पुरुषांमध्ये तर 75 टक्के स्त्रियांमध्ये सोशल मीडियाकर सेल्फी पोस्ट केल्यानंतर मानसिक ताणाची पातळी काढत असल्याचे दिसून आले. आत्मकिश्वास कमी होण्याचे प्रमाण पुरुषांमध्ये 69 टक्के, तर स्त्रियांमध्ये 74 टक्के आढळले. मुंबईतील 72 टक्के पुरुषांमध्ये, तर 74 टक्के स्त्रिया त्यांच्या रुपाबद्दल असमाधानी असल्याचे आढळले.