संडासात सेल्फी काढा 51 हजार रुपये मिळवा

829

देशभरात स्वच्छता अभियानांतर्गत नागरिकांनी घरात शौचालय बांधावे यासाठी सरकार विविध योजना राबवत आहे. याचपार्श्वभूमीवर नागरिकांना योजनांचा लाभ घेता यावा यासाठी मध्य प्रदेश सरकारने नामी शक्कल लढवली आहे. जर तुम्हांला या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही घरातील शौचालयात उभे राहून सेल्फी काढा व तो सेल्फी सरकारला पाठवा आणि 51 हजार रुपये मिळवा असा नियमच राज्य सरकारने केला आहे.

मध्य प्रदेश सरकारने विशेष करुन कन्या विवाह योजना, निकाह योजनांसाठी हे नियम बनवले आहेत. जर या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हांला संडासात उभे राहून सेल्फी काढावे लागतील. ते सेल्फी सरकारला पाठवाल तरच तुम्हांला 51 हजार रुपये मिळतील. अन्यथा नाही असा नियम राज्य सरकारने काढला आहे. यासाठी नववधूला लग्नानंतर पतीच्या घरातील संडासात उभे राहून सेल्फी काढावी लागणार आहे. नंतर तो सेल्फी सरकारी कार्यालयात जमा करावा लागणार आहे. यासाठी भोपाळमध्ये फॉर्म स्वीकारले जात आहेत. नवरदेवाच्या घरी शौचालय असेल तरच त्याच्या वधूला कन्या विवाह किेवा निकाह योजनेच्या अंतर्गत हा लाभ घेता येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या