लालकृष्ण आडवाणी पुन्हा रुग्णालयात

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान भारतरत्न लालकृष्ण आडवाणी यांना मंगळवारी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 96 वर्षीय आडवाणी यांची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले. युरोलॉजिस्ट डॉ. विनीत सुरी यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या आधी 26 जून रोजी दिल्लीच्या एम्समधील युरोलॉजी विभागात त्यांच्यावर किरकोळ शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले होते. पण जुलैच्या पहिल्या आठवडय़ात रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अपोलोमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तेव्हा ते एक दिवसानंतर  घरी परतले होते.