अमरावतीत कोरोनाचा दुसरा बळी? ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू; अहवाल प्रलंबित

file photo

2  एप्रिल रोजी येथील अमरावतीतील हाथीपुरा भागात कोरोनाने एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर सोमवारी रात्री पुन्हा सुफियाननगरात राहणाऱ्या एका नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना 6 एप्रिल रोजी सुपर स्पेशालिटी रूग्णालयातील कोविड वॉर्डात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर काही वेळातच संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यांचे वय 59 वर्ष होते. त्यांचा थ्रोट स्वॅब घेण्यात आला असून, त्याचा अहवाल प्रलंबित आहे.

सदर इसमास दवाखान्यात दाखल करण्यात आल्यानंतर त्याची लक्षणे कोरोना सदृश्य होती. त्यामुळे संबंधित व्यक्ती सुध्दा कोरोनामुळेच मृत्यु झाला असावा अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. म्हणूनच त्याचा थ्रोट स्वॅब तपासण्यासाठी पाठविण्यात आला आहे. दरम्यान, सदर नागरिकाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले असून, आवश्यक तपासणी होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या