
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ज्येष्ठ नागरिकांचा पाठिंबा शिवसेनेलाच असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्येष्ठ नागरिकांनी आज शिवसेना भवन येथे एकत्र येत शिवसेनेलाच विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
ज्येष्ठ नागरिकांनी शिवसेना नेते सुभाष देसाई यांची शिवसेना भवन येथे भेट घेऊन आपण शिवसेनेच्या पाठीशी असल्याचे सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच मुंबईला सुरक्षित ठेवू शकतात याबाबत मतदारांमध्ये जनजागृती करणार असल्याचे या वेळी ज्येष्ठांनी सांगितले. मागील 25 वर्षांपासून शिवसेनेमुळेच मुंबईकरांना चांगल्या सुविधा मिळाल्या. हाच पक्ष मुंबईची चांगली काळजी घेईल असा ठाम विश्वासही या वेळी ज्येष्ठांनी व्यक्त केला.






























































