ज्येष्ठ गणितज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांचं निधन, पुण्यात घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ गणितज्ञ, शास्त्रज्ञ आणि लेखिका डॉ. मंगला नारळीकर यांचे पुण्यात राहत्या घरी निधन झाले. त्या 79 वर्षांच्या होत्या. गेले काही महिने त्यांना कॅन्सरचा पुन्हा एकदा त्रास सुरू झाला होता. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत पत्नी आणि सहकारी म्हणून मंगलाताईंची खंबीर साथ लाभली. त्यांना गीता, गिरिजा व लीलावती अशा तीन कन्या आहेत. 1966 मध्ये त्यांचा डॉ. जयंत नारळीकर यांच्याशी विवाह झाला.