आठवडाभरात शेअर बाजाराचा दुसरा रेकॉर्ड, ३७,७१४ चा टप्पा गाठला

18

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबई शेअर बाजारासाठी ऑगस्ट महिना जबरदस्त ठरला. आठवडाभरात शेअर बाजारात दुसरा धमाका पाहायला मिळाला. १ ऑगस्टला ३७,७११.८७ वर पोहोचलेल्या शेअर बाजाराने आज पुन्हा एकदा विक्रम नोंदवला. शेअर बाजाराने ३७,७१४ चा टप्पा गाठला. तर शेअर बाजाराचा निफ्टीही ११,३९०.५५ बंद झाला.  

बँकेचा निफ्टी पहिल्यांदा २७,९०० पार

सरकारी आणि खासगी बँकांच्या शेअर्सच्या खरेदीतही तेजी दिसली. बँकांचा निफ्टी पहिल्यांदा २७,९०० वर पोहोचला.  मुंबई शेअर बाजारातील मध्यम भाग भांडवल असलेल्या कंपन्यांचा निर्देशांक ०.६४ टक्के आणि निफ्टीच्या मध्यम भाग भांडवल असलेल्या कंपन्यांचा निर्देशांक ०.६२ टक्क्यांवर पोहोचला.

रुपया झाला मजबूत 

उद्योगजकांच्या मते हिंदुस्थानातील गुंतवणूकदारांची खरेदी आणि मजबूत झालेल्या रुपयामुळे बाजारात तेजी आली. डॉलरच्या तुलनेत रुपया ६ पैशांनी मजबूत होऊन तो ६८.५४ वर पोहोचला. आशियाई बाजारातही तेजीचे संकेत होते. हॉँगकाँगच्या हँगसँगमध्ये १.३ टक्क्यांची तर जापानच्या निक्केईमध्येही ०.४ टक्क्यांची वाढ तर ऑस्ट्रेलियाच्या शेअर बाजारात ०.७५ टक्क्यांची आणि अमेरिकेच्या डाओ जॉसमध्येही वाढ होऊन तो ०.५४ वर बंद झाला.

  • बँकिंग, आरोग्य, धातू, ऊर्जा, इफ्रास्ट्रक्चर, आयटी, तंत्रज्ञान, ऑटो, एफएमसीजी आणि तेल तसेच गॅस सेक्टरमध्ये शेअर बाजारात १ टक्क्याची वाढ दिसली.
  • आयसीआयसीआय, एसबीआयच्या शेअर्समध्ये २.५ टक्क्यांची तर यस बँक, एक्सिस बँक, वेदांता आणि टाटा स्टील या कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी दिसली. या कंपन्यांच्या शेअर्समध्ये १.५ टक्क्याची वाढ झाली.
आपली प्रतिक्रिया द्या