मुंबई शेअर बाजाराची विक्रमी घोडदौड; 39 हजाराचा टप्पा गाठणार!

सामना ऑनलाईन । मुंबई

शेअर बाजाराची विक्रमी घोडदौड मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशीही सुरुच आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 120 अंकाची वाढ घेऊन 38,814.76 वर मंगळवारी सुरू झाला. आतापर्यंतचा विक्रमी टप्पा गाठत निर्देशांक 38, 920.14 वर पोहचला. बाजार तेजीत राहिल्यास शेअर बाजार 39 हजाराचा टप्पा गाठेल असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

निफ्टीच्या निर्देशांकही 19 अंकाची वाढ घेऊन 11,731.95 वर सुरू झाला. बाजार सुरू झाल्यावर काही वेळातच तो 11,760.20 पर्यंत पोहचला. सोमवारीही बाजारात तेजी होती. सोमवारी मुंबई शेअर बाजार 38,736.88 आणि निफ्टी 11.700.95 वर पोहचला होता. मेटल,पॉवर, टेक,हेल्थकेअर, आयटी, फर्टिलायजर आणि शुगर सेक्टरमध्ये खरेदीला तेजी होती. निफ्टीच्या सर्व सेक्टरमध्ये तेजी दिसून आली. रिलायन्सच्या शेअरने 1,304.30 अकांचा नवा उच्चांक स्थापन केला. एनटीपीसी, कोल इंडिया,वेदांता, सन फार्मा, एशियन पेंटस्,टाटा स्टील, पावर ग्रिड,ओएनजीसी,इंडसइंड बँक, कोटक बँक, एचडीएफसी, टाटा मोटर्स, भारती एअरटेल आणि टीसीएसच्या शेअरमध्ये सुमारे 3.37 टक्क्यांची वाढ झाली.

परदेशी आणि स्थानिकांनी खरेदीत उत्साह दाखवल्याने बाजारात तेजी होती. स्थानिक गुंतवणूकदारांनी सोमवारी 1,117.24 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले. तर परदेशी गुतंवणूकदारांनी 252.52 कोटींची खरेदी केली. अमेरिकी आणि आशियाई बाजारातूनही चांगले संकेत मिळाल्याने बाजाराने उसळी घेतली आहे.