शेअर बाजारात ३८००० अंकाची ऐतिहासिक उसळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
share-market

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबई शेअर बाजारासाठी ऑगस्ट महिना चांगलाच हिट ठरला आहे. पहिल्याच आठवडय़ात दोन वेळा ३७ हजारांचा टप्पा पार केल्यानंतर गुरुवारी सेन्सेक्सने आणखी एक जबरदस्त उसळी घेतली. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने पहिल्यांदाच ३८ हजारांचा टप्पा पार केला, तर निफ्टीही ११,४९५ वर पोहोचून उच्चांक नोंदवला. विदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे शेअर बाजारात तेजी दिसली.

  • बुधवारी शेअर बाजार ३७,९३१.४२ वर पोहोचला होता. गुरुवारी बाजार उघडताच शेअर बाजारात तेजी दिसली आणि निर्देशांक  १३७ अंकांच्या वाढीसह ३८,०५०,१२ वर पोहोचला.
  • बँकिंग, तेल आणि गॅस, रियल्टी, आरोग्य, आयटी, धातू, पायाभूत सुविधा, भांडवली, ऊर्जा, ऑटो या क्षेत्रातील खरेदी-विक्रीचा परिणाम गुरुवारी शेअर बाजारात दिसला.
  • निफ्टी ४५.२० अंकांच्या वाढीसह ११,४९५.२० वर पोहोचला.
  • विदेशी गुंतवणूकदारांनी तब्बल ५६८.६३ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली. तर हिंदुस्थानातील गुंतवणूकदारांनी ३.२५ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली.