कोरोनामुळे स्मार्टफोनची मागणी वाढली; तिमाहीत विक्रीचा विक्रम

कोरोना महामारी रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन घेण्यात आला. लॉकडाऊनमुळे वर्क फ्रॉम होम आणि मुलांचे ऑनलाईन वर्ग सुरू झाले. अजूनही अनेकांचे वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. मुलांचे ऑलाईन वर्ग आणि वर्क फ्रॉम होममुळे हिंदुस्थानींनी मोठ्या प्रमाणात स्मार्टफोनची खरेदी केली आहे. त्यामुळे जुलै ते सप्टेंबरच्या तिमाहीत स्मार्टफोनची विक्रमी विक्री झाली आहे. या तिमाहीत 5 कोटी स्मार्टफोन विकले गेले आहेत. स्मार्टफोनच्या विक्रीत 8 टक्क्यांची वाढ झाली आहे.

स्मार्टफोन विक्रीचा विक्रम
जुलै ते सप्टेंबरच्या तिमाहीत स्मार्टफोनच्या विक्रीत 14.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एखाद्या तिमाहीत विक्रीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचा हा विक्रम असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. विशेष म्हणजे स्मार्टफोनची विक्री ऑनलाईन पद्धतीने सर्वाधिक झाली आहे. अॅप्पलसाठीही ही तिमाही फायदेशीर ठरली आहे. कंपनी विक्रीमध्ये सहाव्या स्थानावर पोहचली आहे.

मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये, म्हणून अनेकांनी स्मार्ट फोनची खेरदी केली. लॉकडाऊनच्या काळात वर्क फ्रॉम होम करणे गरजेचे होते. त्यासाठीही अनेकांनी स्मार्टफोनची खरेदी केली. त्यामुळे जुलै ते सप्टेंबरच्या तिमाहीत स्मार्टफोनविक्रीचा विक्रम झाला आहे. याकाळात रेडमी कंपनीचे मोबाईलची सर्वाधिक विक्री झाली आहे.

रेडमीच्या विक्रीत 9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर कंपनीचे एकूण 1.31 कोटी मोबाईल विकले गेले आहेत. रेडमीनंतर सॅमसंगच्या स्मार्टफोनची सर्वाधिक विक्री झाली आहे. सॅमसंगच्या मोबाईल विक्रीत 7 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर तर कंपनीचे तब्बल 1.02 कोटी स्मार्टफोन विकले गेले आहेत.

या स्मार्टफोननंतर विवो कंपनीच्या स्मार्टफोनला मागणी होती. विवोची मागणी 19 टक्क्यांनी वाढली असून कंपनीचे 88 लाख स्मार्टफोन विकले गेले आहेत. तसेच रियलमी कंपनीचे 87 लाख स्मार्टफओन विकले गेले आहेत. तर पाचव्या स्थानावर ओपो असून त्यांचे 61 लाख स्मार्टफोन विकले गेले आहेत.

डिजिटल कनेक्टिव्हिटीची गरज
ऑनलाईन क्लास आणि वर्क फ्रॉम होममुळे मागणीत वाढ झाली. त्याचबरोबर डिजिटल कनेक्टिव्हिटीची गरज वाढत आहे. त्यामुळे स्मार्टफोनच्या विक्रीत वाढ झाल्याचे शिओमी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनुकुमार जैन यांनी सांगितले. गेल्या वर्षात सणांच्या काळात हिंदुस्थानात 1.2 कोटीपेक्षा जास्त स्मार्टफोनची विक्री झाली होती. तर या वर्षात 80 लाख स्मार्टफोन विकले गेल्याचे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या