लाईट, कॅमेरा, ऍक्शन… लाॅकडाऊननंतर तब्बल 3 महिन्यांनी चित्रीकरण सुरू

988

कोरोना संकटामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये शिथीतला देण्यास सुरुवात झाली आहे. हळूहळू सर्व क्षेत्र सुरू होत आहेत. राज्य शासनाने नुकतेच ग्रीन सिग्नल दिल्यानंतर चित्रपटसृष्टीचे माहेरघर अर्थात करवीरनगरीत कलेला राजाश्रय देणारे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या काल जयंतीपासुन प्रत्यक्ष चित्रीकरणास सुरुवात झाली आहे. शूटिंगवेळी मास्क

लाॅकडाऊनपुर्वी येथे तीन मालिकांचे चित्रीकरण सुरू होते. यापैकी ‘तुझ्यात जीव रंगला ‘ या मालिकेची मुंबई,पुण्यातील प्रमुख कलाकार व तंत्रज्ञ अशी 22 जणांची टीम येथे दाखल होऊन त्यांचा क्वारंटाईन कालावधीही पूर्ण झाला आहे. तर सोमवार पासून चित्रीकरणास सुरुवात होणार होती. पण प्रत्यक्षात काल राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी प्रतिमापूजन करुन या मालिकेच्या चित्रीकरणास सुरुवात झाली. आवश्यक मनुष्यबळ आणि शासनाच्या नियमानुसार सेटवर सगळ्यांना मास्क, हँडग्लोव्हज, निर्जंतुकीकरण, सोशल डिस्टन्सिंग तसेच दररोज थर्मल स्कॅनिंग करूूनच चित्रिकरण सुरू करण्यात येत असल्याचे प्राॅडक्शनचे रवी गावडे यांनी सांगितले.

img-20200627-wa0014

मुंबईत फिल्मसिटीमध्ये देखील मालिकांचे शूटिंग अटी आणि शर्थीसह सुरू झाले आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यापासून बंद असलेला कॅमेरा पुन्हा रोल होणार असून प्रेक्षकांना मालिकेचे नवीन भाग पाहायला मिळतील.

आपली प्रतिक्रिया द्या