जालन्यात आढळले कोरोनाचे 7 रुग्ण, तर एका रुग्णाचा अहवाल दुसर्‍यांदा पॉझिटीव्ह

474

जालना जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी आणखी नवीन सात संशयीत रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह  प्राप्त झाले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 84 वर पोहोचली आहे. दरम्यान, यापुर्वी पॉझिटीव्ह अहवाल प्राप्त झालेल्या एका रुग्णाचा अहवाल आज दुसर्‍यांदा पॉझिटीव्ह आल्याचे या सुत्रांनी स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत 21 रुग्ण कोरोनामुक्त  झाले असून 63 रुग्ण उपचार घेत आहेत. जालना जिल्हा सरकारी रुग्णालयाने मंगळवारी सायंकाळी जालना जिल्ह्यातील 186 संशयीत रुग्णांच्या स्वॅबचे नमुने घेऊन ते  प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी आज बुधवारी जिल्हातील 125  जणांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले होते. त्यामुळे जिल्हा वासियांना चांगलाच दिलासा मिळाला होता. मात्र हा दिलासा मिळून काही तास उलटत नाही तोच पुन्हा चिंता वाढविणारी बातमी समोर आली आहे. प्रयोग शाळेकडे 186 पैकी प्रलंबित असलेल्या 61 संशयित रुग्णांचे अहवाल आज 27 मे रोजी सायंकाळी जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाले आहेत. त्यात जुना जालना भागातील प्रतिष्ठित समजल्या जाणार्‍या व यापुर्वी पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आलेल्या एका खाजगी रुग्णालयातील आणखी चार कर्मचार्‍यांचे अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झले ओहत. तसेच घनसावंगी तालुक्यातील पीरगेबवाडी 1, खापरदेव हिवरा 1, जालना तालुक्यातील वखारी वडगाव 1, याप्रमाणे नवीन सात पॉझिटीव्ह रुग्णांची जिल्ह्यात भर पडली असून जिल्ह्याची संख्या 84 वर पोहचली आहे. विशेष म्हणजे हे सर्व रुग्ण पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे बाधित झाले असल्याचे सुत्रांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या