वडील यूकेचे, आई हिंदुस्थानी; सात वर्षांच्या मुलीला मिळाले नागरिकत्व

वडील यूकेचे व आई हिंदुस्थानी असलेल्या सात वर्षांच्या मुलीला हिंदुस्थानचे नागरिकत्व देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

या मुलीच्या वडिलांना हिंदुस्थानचे नागरिकत्व देण्याचा विषय प्रलंबित आहे. स्वतःचे नागरिकत्व संरक्षित राहावे यासाठी या मुलीने याचिका दाखल केली होती. न्या. सारंग कोतवाल व न्या. आशीष चव्हाण यांच्या खंडपीठाने ही याचिका मंजूर केली. या मुलीला हिंदुस्थानचा पासपोर्ट व नागरिकत्व द्या, असे आदेश न्यायालयाने प्राधिकरणाला दिले.

काय आहे प्रकरण…

या मुलीचे वडील यूकेहून हिंदुस्थानात शिक्षण व्हिसावर आले होते. त्याला मुदतवाढ मिळाली. नंतर त्यांनी येथेच विवाह केला. व्हिसा संपल्याने स्थानिक न्यायालयाने त्यांना इंग्लंडमध्ये परत पाठवण्याचे आदेश दिले होते.