दुष्काळाने मराठवाडा होरपळला! संभाजीनगर, बीड, जालन्यात भयंकर परिस्थिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

सामना ऑनलाईन, संभाजीनगर

सलग तीन महिन्यांपासून पाऊस नसल्याने मराठवाडय़ावर दुष्काळाचे संकट ओढवले आहे. भयावह असलेल्या या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी तसेच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी संभाजीनगरात येत आहेत.

संभाजीनगर जिह्यात या वर्षी पावसाने दगा दिल्यामुळे खरीप हंगाम वाया गेला असून भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वार्षिक सरासरीच्या केवळ 53.26 टक्के पाऊस झाला आहे. जिह्यातील  गंगापूर, पैठण, रत्नपूर या तीन तालुक्यात सर्वात कमी  45 टक्के इतका पाऊस पडला, तर वैजापूर, कन्नड, संभाजीनगर, सिल्लोड,सोयगाव, फुलंब्री या तालुक्यातही कमी पाऊस पडला असून जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, मका, तूर, मूग, भुईमूग ही पिके उद्ध्वस्त झाली आहेत.  त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले असून पावसाअभावी रोजगाराची समस्या निर्माण झाली आहे.

जिह्यातील 1,355 महसुली गावांपैकी 1,335गावांची नजर आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आली आहे. त्यामुळे भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या बुधवारी जिह्याच्या दौऱयावर येत आहेत. जिह्यातील संभाव्य दुष्काळ परिस्थितीचा  नवीन निकषानुसार यात कनस्पती स्थिती निर्देशांक, लागकडीखालील क्षेत्र, मृदा आर्द्रता क जल उपलब्धता यापैकी तीन निर्देशांकानुसार दुष्काळाचे सर्वेक्षण सुरू आहे. त्यासाठी तालुकास्तर व क्षेत्रीयस्तर समिती स्थापन करण्यात आली असून यासमितीकडून सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. जिह्यात दुष्काळाची दुसरी कळ घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या मुख्यमंत्री येणार  असल्याने या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. याबाबत कृषी विभागाने जोरदार तयारी केली असून उद्या दुष्काळाबाबत मुख्यमंत्री काय घोषणा करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

समांतर, भूमिगत, कचऱयाचा घेणार आढावा

जिल्ह्यातील पाणीटंचाई, चाराटंचाई, रोजगार, उपलब्ध जलसाठा यांचा आढाका घेतला जाणार आहे. तसेच सकाळी साडेअकरा काजता महापालिका आयुक्त आणि पदाधिकाऱयांसोबत समांतर योजना, भूमिगत योजना, स्मार्ट सिटी, अमृत योजना आणि कचरा व्यवस्थापन कामाचा आढावा मुख्यमंत्र्यांकडून घेतला जाणार आहे.तर दुपारी एक काजता कायदा क सुक्यकस्था याकर चर्चा होईल.