‘शब-ए-बारात’ ची दुवा घरीच मागा; भिवंडीतील 23 कब्रस्ताने सील!

432

‘कोरोना’ विरुद्धचे युद्ध आता जोमाने सुरू झाले असून भिवंडी शहरातही विशेष दक्षता घेण्यात येत आहे. ‘शब- ए- बारात’ साठी गर्दी टाळण्यासाठी महापालिका क्षेत्रातील 23 कब्रस्ताने सील करण्यात आली आहेत. शब ए बारातसाठी कब्रस्तानात जाण्याऐवजी आपल्या पूर्वजांसाठी घरात बसूनच दुवा मागा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान , भिवंडी शहरातील सर्व मशिदी बंद असून कोणतेही धार्मिक कार्यक्रम करण्यास पोलिसानी बंदी घातली आहे.

मुस्लिम बांधवांचा ‘शब-ए-बारात’ हा धार्मिक कार्यक्रम गुरुवारपासून सुरू होत आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता भिवंडीचे पोलीस, महसूल, पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. यासाठी भिवंडी शहरातील  23 कब्रस्ताने सील करण्यात आली आहेत. ‘ शब-ए-बारात’ निमित्त मुस्लिम बांधव कब्रस्तानमध्ये पूर्वजांसाठी दुवा मागत नमाज पठण करतात. पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडूनसर्व खबरदारी घेतली जात असून, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस  उपआयुक्त राजकुमार शिंदे यांनी केले आहे.  कब्रस्तनांच्या ट्रस्टींना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. दरम्यान, पोलिसांनी भिवंडी शहरात संचलन केले असून खबरदारी म्हणून शहरात 24 तास मोठ्या प्रमाणात नाक्या  नाक्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर  एसआरपीएफ  जवानांचे  पथक 6 ठिकाणी  तैनात  करण्यात  आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या