Shabana Azmi News – शबाना आझमी यांना स्वाइन फ्लूची लागण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांना स्वाइन फ्लू (H1N1) झाल्याचे निदान झाले आहे. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांनी आगामी सर्व सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असून डॉक्टरांनी त्यांना पाच दिवस पूर्ण विश्रांती आणि विलगीकरणाचा सल्ला दिला आहे.

 

View this post on Instagram

 

शबाना आझमी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. आंदोलनातील एक फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले की, त्या काल मुंबईतील आंदोलनात सहभागी होणार होत्या, मात्र H1N1 ची लागण झाल्यामुळे त्यांना पुढील पाच दिवस विलगीकरणात राहावे लागेल. असे असले तरी, त्या आंदोलनातील तरुणांच्या पाठीशी पूर्णपणे खंबीरपणे उभ्या असून त्यांच्याबद्दल त्यांनी आपला पाठिंबा आणि कौतुक व्यक्त केले आहे. तरुण पिढीच्या धैर्यामुळे व दृढनिश्चयामुळे आपल्याला सतत प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले असून, या संदेशासोबत त्यांनी त्यांचे वडील कैफी आझमी यांची ‘नौजवान’ ही कविताही शेअर केली आहे. त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी चाहते सोशल मीडियावर प्रार्थना करत आहेत.