शबाना आझमी गंभीर, मुंबई-पुणे महामार्गावर भीषण दुर्घटना

571

बुजुर्ग अभिनेत्री शबाना आझमी यांच्या कारला खालापूर टोलनाक्याजवळ असलेल्या ढेकू गावात अपघात झाला. या दुर्घटनेत आझमी गंभीररीत्या जखमी झाल्या असून त्यांना उपचाराकरिता नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर रात्री त्यांना मुंबईतील कोकिळाबेन अंबानी रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या शबाना आझमी यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या निगराणीखाली असल्याचे रुग्णालयाचे एक्झुक्युटिव्ह सीईओ डॉ. संतोष शेट्टी यांनी सांगितले.

शबाना आझमी या मुंबईहून पुण्याकडे आज दुपारी चारच्या सुमारास आपल्या टाटा सफारीने जात होत्या. खालापूर टोलनाक्याजवळील ढेकू गावच्या हद्दीत चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि समोरून जाणाऱया मालवाहू ट्रकवर त्यांची कार जोरात आदळली. ही धडक इतकी भीषण होती की, गाडीच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झालाच, पण मागच्या सीटवर बसलेल्या शबाना आझमी यांच्या डोक्याला व डोळय़ाला जबर दुखापत झाली. यावेळी त्यांचे पती गीतकार जावेद अख्तर हेही त्यांच्यासोबत होते.

आपली प्रतिक्रिया द्या