स्पोर्ट्सवर आधारित दोन बायोपिकचे पोस्टर रीलीज

बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचे वारे वाहत आहेत. नुकतेच दोन खेळाडूंच्या आयुष्यावर आधारित बायोपिकचे पोस्टर रीलीज करण्यात आले आहेत. एका बायोपिकमध्ये तापसी पन्नू आणि दुसर्‍या बायोपिकमध्ये अजय देवगन दिसणार आहे. तापसी पन्नू एका महिला क्रिकेटरची भुमिका बजावणार आहे, तर अजय देवगण फुटबॉल प्रशिक्षकाची भुमिका बजावणार आहे.
हिंदुस्थानी क्रिकेट खेळाडू मिताली राज यांच्या आयुष्यावर आधारित शाब्बास मिठ्ठू या चित्रपटाचा पोस्टर रीलीज झाला आहे.

आंतराराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा मिताली राज यांच्या नावावर आहेत. तसेच सर्वाधिक अर्धशतकाचा रेकॉर्डही त्यांच्या नावावर आहे. मिताली राज यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 2017 मध्ये विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचली होती. केवळ 9 धावांमुळे इंडियाचे विश्वचषकाचे स्वप्न अपूर्ण राहिले. त्यांच्या आयुष्यावर हा चित्रपट असून तापसी पन्नू त्यांची भुमिका साकरणार आहे.

अजय देवगण यांचा मैदान हा चित्रपट फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांच्या आयुष्यावर आधारित आहे.


1951 ते 1962 दरम्यान हिंदुस्थानी फुटबॉलचे ते प्रशिक्षक होते. त्यांच्यामुळेच हिंदुस्थान १९५६ च्या मेलबर्नच्या ऑलिम्पिकमध्ये पोहोचला होता. 1962 च्या जकार्तामध्ये झालेल्या एशियन्स गेम्समध्ये हिंदुस्थानने सुवर्ण पदक पटकावले होते.

शाब्बास मिठ्ठू हा 5 फेब्रुवारी 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे. तर अजय देवगवणचा मैदान हा चित्रपट 27 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या