अबू धाबीच्या यास आर्यर्लंड येथे हिंदी चित्रपटसृष्टीतील सगळ्यात मोठा ‘आयफा 2024’ पुरस्कार सोहळा पार पडला. शाहरुख खानने ‘जवान’ मधील त्याच्या दमदार अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकला. राणी मुखर्जीनं ‘मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे’ मधील उत्कृष्ट भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला. त्याचबरोबर रणबीर कपूरच्या ‘ऑनिमल’ चित्रपटानेदेखील अनेक पुरस्कार पटकावले.
या पुरस्कार सोहळ्यात गेल्या वर्षभरात प्रदर्शित झालेल्या बॉलिवूड चित्रपटांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी कलाकारांचे दमदार परफॉर्मन्स झाले. ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांना आऊटस्टँडींग अचिव्हमेंट इन इंडियन सिनेमा हा विशेष पुरस्कार देण्यात आला.
विजेत्यांची यादी
सर्वोत्कृष्ट चित्रपट ः संदीप रेड्डी वांगा यांचा ऑनिमल
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ः विधु विनोद चोप्रा, 12 वी फेल
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता ः अनिल कपूर, ऑनिमल
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री ः शबाना आझमी, रॉकी और रानी की प्रेम कहानी
सर्वोत्कृष्ट ः बॉबी देओल, ऑनिमल
सर्वोत्कृष्ट कथा ः रॉकी और रानी की प्रेम कहानी
सर्वोत्कृष्ट कथा (रूपांतरित) ः 12 वी फेल
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन ः प्रीतम, विशाल मिश्रा, मनन भारद्वाज, श्रेयस पुराणिक, जानी, भूपिंदर बब्बल, आशिम केमसन, हर्षवर्धन रमेशवा, ऑनिमल
सर्वोत्कृष्ट गीत ः सिद्धार्थ सिंग आणि गरिमा वहल, सतरंगा, ऑनिमल
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक ः भूपिंदर बब्बल – अर्जन वैली (ऑनिमल)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका ः शिल्पा राव – चलेया (जवान)
चित्रपटसृष्टीत 25 वर्षे पूर्ण केल्याबद्दल अचिव्हमेंट अवॉर्ड ः करण जौहर