शाहरुख खानने मराठीत मानले मुख्यमंत्र्याचे आभार, सीएम फंडाला केली मदत

अभिनेता शाहरुख खान याने पुढाकार घेत पंतप्रधान सहाय्यता निधीला व मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत केली आहे. तसेच शाहरुख खानच्या संस्थेतून दररोज दोन हजार लोकांसाठी ताजं जेवण तयार केलं जाणार आहे. शाहरुखच्या या पुढाकाराबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले आहेत. त्यावर शाहरुखने मुख्यमंत्री यांच्या ट्विटला मराठीत उत्तर दिले आहे.

शाहरुख खान व पत्नी गौरी खान यांनी त्यांच्या रेड चिलीज फाऊंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्राला मदत जाहीर केली आहे. त्यांच्या या मदतीसाठी मुख्यमंत्री कार्यालायाकडून ट्विट करून त्यांचे आभार मानन्यात आले होते. त्या ट्विटला उत्तर देताना शाहरुख खानने मराठीत उत्तर दिले आहे. ‘ या लढाईत आपण सगळे एकत्र आहोत कारण थेंबे थेंबे तळे साचे. सर्वांनी थोडे थोडे प्रयत्न केले तर एक मदतीचा महासागर तयार होईल… आपल्या मार्गदर्शनासाठी धन्यवाद! आपण सर्व एक कुटुंब आहोत. आपल्याला एकमेकांना सुदृढ ठेवण्यासाठी एकत्र राहिले पाहिजे’, असे ट्विट शाहरुखने केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या