तीन वर्षांनंतर जसवीर पुन्हा छोट्या पडद्यावर

कलर्स वाहिनीवर आता नवे एपिसोड्स पाहायला मिळणार आहेत. त्यात काही थोडेफार बदलही करण्यात आले आहेत. यातच ‘शक्ती – अस्तित्त्व के एहसास की’ या मालिकेत परमीतची भूमिका करणार्‍या गौरी टोंक हिच्या जागी आता अभिनेत्री जसवीर कौर घेणार आहे असे कळते. विशेष म्हणजे जसवीर तब्बल तीन वर्षांनी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर चमकणार आहे. याआधी ती अखेरची 2017 मध्ये टीव्हीवर दिसली होती. त्यानंतर तिने बाळंतपणासाठी सुट्टी घेतली होती. यावर बोलताना जसवीर म्हणाली, ‘या मालिकेत सहभागी होताना मला खूपच आनंद होतोय. ही मालिका काहीशी वेगळी आहे. रुळलेल्या वाटा मोडणारी आहे, म्हणूनच प्रेक्षकांना ती आवडतेय. विराट आणि हीरच्या या नव्या आयुष्यात मी महत्वाची भूमिका करणार आहे, विराटच्या आईची. इंडस्ट्रीसाठी जसा हा काळ नव्याची सुरूवात असणारा आहे तशी माझ्यासाठीही ही एक नवी सुरूवात असणार आहे. मला आशा आहे की माझ्या चाहत्यांना माझा हा नवा अवतार आवडेल.’

आपली प्रतिक्रिया द्या