गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतले ‘पांढरेपाणी’ गाव दत्तक

609

कराडजवळ डोंगरपठारावर वसलेल्या पांढरेपाणी गावाला यापुर्वी मुलभूत सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. यापूर्वी केवळ पांढरेपाणी गावाच्या विकासाच्या चर्चाच झाल्या आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत रस्ता मंजूर करण्यात आला. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी हे गाव दत्तक घेत असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी यांनी केली.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत शंभूराज देसाईंनी मंजूर केलेल्या पांढरेपाणी (ता.पाटण) येथील गावपोहोच रस्त्याचे भूमिपूजन झाले. शंभूराज देसाईंनी 1 कोटी 94 लाख रुपयांचा निधी मंजुर करुन घेतला आहे. शंभूराज देसाई यांचा पांरपारिक पध्दतीने घोंगडे व काठी देवून सत्कार करण्यात आला. मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, जिल्हा परीषद सदस्या सुग्रा खोंदू, बशीर खोंदू, नथूराम कुंभार,शिवदौलत बँकेचे दगडू शेळके, भागोजी शेळके, किसन गालवे, गणेश भिसे, रमेश गालवे, आटोलीचे सरपंच सावळाराम शेळके, उपसरपंच भिमराव जगताप, राम पवार, लक्ष्मण शेळके, दिनकर शिंदे, बंडू चाळके, दिनकर कोळेकर, आनंदा मोहिते उपस्थित होते.

शंभूराज देसाई म्हणाले, 2014  आणि 2019 च्या निवडणूकीमध्ये 100 टक्के मतदान करीत गावातील गावकऱ्यांनी एकही मत विरोधात जावू दिले नाही. मतदारसंघात मताच्या बाबतीत पहिल्या क्रमांकाचे बक्षिस या गावाने मिळविले आणि आत्ताही मिळवले आहे. आगामी आर्थिक वर्षात उर्वरीत कामांना आवश्यक निधी मंजूर करुन देण्यासाठी कटिबध्द असून एक मंत्री म्हणून या गावांच्या विकासाकरीता हे गाव दत्तक घेत आहे. या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यस्तरीय,जिल्हास्तरीय यंत्रणेकडील आवश्यक योजना राबवण्यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे. या गावाला आवश्यक असणारी विविध विकासकामे पूर्ण करण्याची जबाबदारी आता माझी आहे, असे मंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगितले. भूमिपुजन कार्यक्रम झाल्यानंतर ग्रामस्थांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा पांरपारिक पध्दतीने घोंगडे व काठी देवून सत्कार केला. आमच्या गावाच्या विकासासाठी आम्हाला पाठबळ देणाऱ्या देसाई कुटुंबांच्या पाठीशीच ठाम उभे असल्याचे ग्रामस्थांनी शंभूराजे देसाईंना सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या