शरद पवार यांना विश्रांतीचा सल्ला

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे त्यांचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. सोमवार, मंगळवार दोन दिवस शरद पवार विदर्भ दौऱ्यावर होते. मात्र तब्येत बिघडल्याने हा दौरा रद्द करण्यात आला आहे. डॉक्टरांनी शरद पवार यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात पक्ष बांधण्यासाठी शरद पवार महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मात्र शरद पवार यांची अचानक तब्येत बिघडल्याने पुढील चार दिवसांसाठी सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. लोकसभा, विधानभा निवडणुकीनंतरही पवार यांचे महाराष्ट्रासह देशभर दौरे सुरू असून सभा, कार्यक्रम व बैठकांना ते उपस्थित राहून संवाद साधत आहेत. मात्र गेल्या 8 ते 10 दिवसांपासून शरद पवार यांना खोकल्याचा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे त्यांना बोलताना, भाषण करताना मर्यादा येत आहेत. शरद पवार यांना डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. कार्यकर्त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.