केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचे भाव वाढले, शरद पवार यांची टीका

1425

कांद्याचे भाव गगनाला भिडल्याने लोकांच्या ताटातून कांदा गायब झाला आहे. केंद्र सरकारमुळे कांद्याचे भाव वाढले अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. केंद्राने वेळीच कांद्याला योग्य तो भाव न दिल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे असे पवार म्हणाले.

इंडियन एक्सप्रेस या दैनिकाला मुलाखत देताना पवार म्हणाले की “चार पाच महिन्यांपूर्वी कांद्याला योग्य भाव न मिळाल्याने शेतकर्‍यांनी कांदा रस्त्यावर फेकून दिला. तेव्हा अनेक शेतकर्‍यांनी कांद्याऐवजी दुसरे पीक घेतले. आता कांद्याचे उत्पादन कमी झाल्यमुळे परदेशातून आयात करावा लागत आहे.” ही केंद्र सरकारची चूक आहे. भविष्यात असे काही तरी होईल असे केंद्र सरकारला पत्र लिहून कळवलेही होते असेही पवार म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या