मी नाईलाजाने अजित पवारांसोबत आहे, पण माझे खरे नेते हे शरद पवारच आहेत असे विधान अजित पवार गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे. तसेच सरकारने राज्य सहकारी बँकेला 300 कोटी रुपये दिले असेही शिंगणे म्हणाले.
राजेंद्र शिंगणे हे सिंधखेड राजा विधानसभेचे आमदार आहेत. 2023 साली अजित पवार यांनी शरद पवारांपासून फारकत घेतली आणि महायुती सरकारमध्ये सामील झाले. यावेळी शिंगणे यांनी अजित पवारांची साथ दिली. शिंगणे म्हणाले की जरी मी अजित पवार गटात असलो तरी शरद पवारच माझे नेते आहेत. अजित पवार गटात जरी मी सामील झालो असलो तरी शरद पवार यांच्याशी मी कुठलेही नाते तोडलेले नाही. तीस वर्षे मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे. भविष्यातसुद्धा शरद पवार यांचे नेतृत्व राज्याला आणि देशाला आश्वासक राहणार आहे असेही शिंगणे म्हणाले.
बँकेला 300 कोटी रुपये
शिंगणे म्हणाले की मध्ये बँकेच्या अडचणीमुळे मी अजित पवार यांच्यासोबत गेलो. पण सरकारने राज्य सहकारी बँकेला 300 कोटी रुपये दिले. असले असले तरी शरद पवार माझ्यासाठी आदरणीय असतील असेही शिंगणे म्हणाले.