अवकाळी पावसामुळे हवालदिल झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याला वाचवा – शरद पवार

416
sharad-pawar-new

 अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकरी हवालदिल झाला आहे. या परिस्थितीत राज्यपालांनी जाहीर केलेली आठ हजार कोटींची मदत अपुरी असून शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 30 हजारांची मदत दिली जावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. केंद्रात यूपीएच सरकार असताना 2012-13 मध्ये शेतकऱयांना हेक्टरी 30 हजार रुपयांची मदत दिली होती अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन अवकाळी पावसामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती दिली. जवळपास पाऊन तास या दोघांमध्ये चर्चा झाली. वसंतदादा शूगर इन्स्टिटय़ूटसंबंधी कार्यक्रमाच निमंत्रणही त्यांनी यावेळी मोदींना दिले.

आपली प्रतिक्रिया द्या