प्रकाश आंबेडकरांनी आम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवू नये, शरद पवारांचा टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ‘राष्ट्रवादी हा पक्ष धर्मनिरपेक्ष नसता तर अकोल्यात 2 निवडणुकांमध्ये प्रकाश आंबेडरकरांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला नसता. त्या ठिकाणी शरद पवार नाही तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते. तेव्हा ते धर्मनिरपेक्ष वाटत होते पण आता वाटत नाही,’ असा टोला पवारांनी प्रकाश आंबेडकरांना लगावला आहे. एका खासगी वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.

प्रकाश आंबेडकर यांची ओवेसी यांच्याशी हातमिळवणी

यासह पवारांनी यावेळी एक आठवणी सांगितली. ‘वर्ष कोणते हे आता आठवत नाही, परंतु ईशान्य मुंबईमध्ये आम्ही उभ्या केलेल्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाने एक उमेदवार दिला होता. त्याचा फायदा भाजपच्या प्रमोद महाजन यांना झाला. भाजपच्या फायद्यासाठी निवडणुकीमध्ये उमेदवार उभा करण्याची ऐतिहासिक कामगिरी करणारी लोक इतरांना धर्मनिरपेक्ष कोण आणि कोण नाही हे सांगत आहेत’, असा निशाणाही पवारांनी साधला.

नक्की काय आहे प्रकरण?
यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार हे धर्मनिरपेक्ष आहेत परंतु त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष धर्मनिरपेक्ष नाही असे म्हटले होते. संभाजी भिडेंटी पिल्लावळ राष्ट्रवादीत आहे. उदयनराजे भोसले भिडेंची बाजू प्रकार्शाने मांडतात. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत जाण्यास आम्हाला अडचण आहे. आम्ही काँग्रेससोबत युतीसाठी तयार आहोत परंतु त्यांच्या मित्रांसोबत नाही, असे म्हटले होते.