शरद पवारांची पाठ फिरताच राष्ट्रवादीत दोन गटात वाद

8363

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा संपताच पक्षाच्या दोन गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप केला, तर जगताप समर्थकाकडून कळमकर यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. दोन्ही गट पोलीस ठाण्यात पोहचले असून, पोलिसांसमोर एकत्रित बोलणे सुरु आहे.

पवार यांच्या उपस्थित नंदनवन लॉन्स येथे मेळावा होता. तो संपल्यावर बाहेर पडत असताना जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी धकबुक्की केली, असा कळमकर यांचा आरोप आहे. ते कोतवाली पोलीस ठाण्यात गेले. याची महिती मिळताच जगताप समर्थकही तेथे आले, त्यांनी कळमकर यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केला. दोन्ही गटांचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात समोरासमोर आल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली. महापालिका निवडणुकीपासून आमदार जगताप व माजी महापौर कळमकर यांच्यात राजकीय वाद निर्माण झाला होता. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तो विकोपाला गेला आहे.

सदरची घटना घडल्यानंतर दोन्ही गट हे कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाले. अभिषेक कळमकर यांच्या समवेत किरण काळे सुध्दा उपस्थित होते. यावेळी तक्रार देण्याचा विषय झाला होता. तर दुसरीककडे आमदार संग्राम जगातप यांचे समर्थक देखील या ठिकाणी दाखल होवून कळमकर गटावर आरोप केला होता. माजी आमदार दादाभाऊ कळमकर व संग्राम जगताप हे दोघी कोववाली पोलिसात दाखल झाले असून त्यांची एकत्रीत चर्चा सुरु झाली आहे. नेमका गुन्हा दाखल होणार की नाही हे पहावे लागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या