
सामना ऑनलाईन । कटक
राष्ट्रीय टेबलटेनिस स्पर्धेला येथील नेहरू स्टेडियमवर उद्यापासून सुरुवात होणार असून यावेळी अनुभवी खेळाडू शरथ कमाल नवव्यांदा या स्पर्धेचा चॅम्पियन होण्यासाठी जीवाचे रान करताना दिसणार आहे. हिंदुस्थानकडून कमलेश मेहता यांनी आठ वेळा राष्ट्रीय चॅम्पियन होण्याचा मान संपादन केला असून आता शरथ कमाल याला नवा विक्रम नोंदवता येणार आहे. दरम्यान, महिला विभागात मनिका बत्रा या स्पर्धेच्या जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानली जात आहे. गेल्या वर्षी तिने राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धेत पदकांची लयलूट केली होती.

























































