सत्तेचा गैरवापर आणि भ्रष्टाचाराचा पुरस्कार हेच सूत्र आज सत्ताधाऱ्यांकडून पाहायला मिळत आहे. सत्ताधाऱ्यांनाच लोकांचा विरोध होताना दिसत आहे. लोकसभेला 400पार काही घडले नाही. चंद्राबाबू आणि नितीशकुमार यांची मदत झाली नसती तर सरकार आले नसते. हेच चित्र आता महाराष्ट्रात दिसत आहे. येथेही लोकांना बदल हवा आहे, असे मत राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.