दुलीप करंडकात शार्दुलकडे पश्चिम विभागाचे नेतृत्व

आगामी दुलीप करंडक स्पर्धेसाठी पश्चिम विभागाने 15 सदस्यीस संघाची घोषणा केली असून, संघाच्या नेतृत्वाची धुरा शार्दुल ठाकूरच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. वांद्रे कुर्ला संकुलातील एमसीएच्या शरद पवार इनडोअर क्रिकेट अकादमीमध्ये झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली.   पश्चिम विभागाच्या या संघात मुंबईचे 7, गुजरातचे 4, महाराष्ट्र आणि सौराष्ट्रचे प्रत्येकी 2 खेळाडू आहेत. ठाकूरसह संघात यशस्वी जैसवाल, श्रेयस अय्यर आणि सरफराज खान यांचाही समावेश करण्यात आला आहे.

पश्चिम विभागाचा संघ  शार्दुल ठाकूर (कर्णधार), यशस्वी जैसवाल, आर्या देसाई, हार्विक देसाई, श्रेयस अय्यर, सरफराज खान, ऋतुराज गायकवाड, जयमीत पटेल, मनन हिंगराजिया, सौरभ नवले, शम्स मुलानी, तनुश कोटियन, धर्मेंद्र जाडेजा, तुषार देशपांडे आणि अर्जन नागवासवाला.