शत्रुघ्न सिन्हांचा युटर्न, लाल किल्ल्यावरील मोदींच्या भाषणाची केली प्रशंसा

731

पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधातील भूमिका घेत भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी आज युटर्न घेत मोदींची प्रशंसा केली आहे. सिन्हा यांनी मोदींच्या स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणाची स्तुती केली आहे.

सिन्हा यांनी ट्विटरवरून मोदींच्या प्रशंसेचे पूल बांधले आहेत. ‘मला हे मान्य करावे लागेल की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लालकिल्ल्यावरील 15 ऑगस्टचे भाषण खूप चांगले, अभ्यासपूर्ण आणि महत्त्वाचे मुद्द मांडणारे होते. हिंदुस्थानातील सर्वात महत्त्वाच्या समस्या पंतप्रधांनी योग्य प्रकारे भाषणातून मांडल्या’, असे सिन्हा यांनी ट्विट केले आहे.

याआधी पी. चिदंबरम यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाची स्तुती केली होती. भाषणातील कुटुंब नियंत्रण, प्लॅस्टिकबंदी या मुद्द्यांचे चिदंबरम यांनी स्वागत केले आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या