शायकोकॅनने बनवले कोरोना प्रतिबंधक उपकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रख्यात वैज्ञानिक आणि संशोधक डॉ. राजाह विजय कुमार यांनी विषाणू प्रतिबंधक उपकरण विकसित केले असून त्याच्या सहाय्याने शाळा-महाविद्यालये आणि घर कोरोना प्रादुर्भावापासून सुरक्षित ठेवता येतील. तसेच रुग्णालये, हॉटेल, कार्यालये, रेस्टॉरंट, ऑडिटोरियम, परिवहन, विक्री दालने तसेच विमानतळांवरील कामकाज पूर्वपदावर आणण्यास मदत मिळेल, असा दावा कंपनीने केला आहे. हे शंकूकार आकाराचे उपकरण शायकोकॅन कॉर्पोरेशनने निर्माण केले असून त्याचे पूर्ण नाव स्केलेन हायपरचार्ज कोरोना ककोन असे आहे. हे उपकरण न्यूमोनिया, एआरडीएस, सार्स, मेर्ससारख्या अन्य विकारांना प्रतिबंध करते.