सिद्धार्थने चुकीचा स्पर्श केला, ‘बालिका वधू’ फेम अभिनेत्रीचा आरोप

3818
sheetal-khandal-siddharth-s

वादग्रस्त रिअॅलिटीशो ‘बिग बॉस’ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी बिग बॉच्या सेटवरील गोंधळामुळे नाही तर ‘बालिका वधू’ मालिकेतील अभिनेत्रीला चुकीचा स्पर्श केल्याचा आरोप एका अभिनेत्यावर करण्यात आला असून तो सध्या बिग बॉसच्या घरात असल्याने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे. #MeToo च्या आरोपांनी या वर्षी अनेकांना अडचणीत आणले होते. आता टीव्ही इंडस्ट्रीत चुकीचा स्पर्श केल्याचे आरोप होत असल्याने पुन्हा एकदा हे अशी प्रकरणे बाहेर येण्याची शक्यता आहे.

sheetal-khandal-1

बिग बॉसमधील अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे कुणाशी तरी भांडण, वाद हे सुरूच असतात. कधी रश्मी देसाई सोबत भांडण तर कधी सिद्धार्थ डेला तोंड फोडून टाकेन अशी धमकी दिल्याने त्याच्यावर टीका होत होती. मात्र आता सिद्धार्थवर एक गंभीर आरोप करण्यात आला आहे. ‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री शीतल खंडाल हिने त्याच्यावर या मालिकेच्या सेटवर चुकीचा स्पर्श केल्याचा आरोप केला आहे.

sheetal-khandal-2

Iwmbuzz ला दिलेल्या एका मुलाखतीत शीतल म्हणाली की, सिद्धार्थ डे सोबत झालेल्या वादात आरती सिंहला साथ दिल्याचा दावा सिद्धार्थ शुक्ला करत आहे. असे करून तो स्वत:ला महिलांबद्दल किती आदर आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. मात्र त्याचा खरा स्वभाव इंडस्ट्रीमधील लोकांना नक्कीच माहीत आहे, अशा शब्दात तिने सिद्धार्थला सुनावले आहे.

sheetal-khandal-5

जेव्हा मी बालिका वधूमध्ये त्याचासोबत काम करत होती तेव्हा त्याच्या sexist behavior ची मी शिकार झाली होती. त्याने अनेक मुलींसोबत तसे करण्याचा प्रयत्न केला होता, मला काय म्हणायचे आहे ते तुम्हाला कळालेच असेल, असे देखील ती म्हणाली.

sheetal-khandal-4

सिद्धार्थने मला चुकीचा स्पर्श केला होता. इतकेच नाही तर नेहमी अत्यंत उर्मट आणि द्वयर्थी भाषेत तो बोलायला, असा गंभीर आरोप तिने केला आहे.

‘त्याच्या अशा वागण्याचा मला त्रास होत होता. मात्र इंडस्ट्रीत नवीन असल्याने मी कुणाला बोलू शकली नाही. अखेर धाडस करून मी एकदा प्रोडक्शन हाऊसला ही गोष्ट सांगितली. मात्र त्यांनी गांभिर्याने घेतले नाही. आपल्याविरोधात तक्रार केल्याचे सिद्धार्थला कळताच त्याने माझ्यावर राग काढला आणि सोबत काम करण्यास नकार दिला’, असे तिने सांगितले.

sheetal-khandal-7

नंतर काही सहकाऱ्यांनी हा वाद संपवून शोसाठी शुक्लासोबत मैत्री करण्याचा सल्ला दिला. मी देखील त्याला होकार दिला. मात्र दुर्दैव असे की तो पुन्हा मूळ स्वभावात परतला.

सिद्धार्थ हा अत्यंत अहंकारी व्यक्ती आहे आणि तुम्ही त्याच्याविरोधात गेल्यास तो तुमच्याशी घाणेरडे वर्तन करतो. सध्या रश्मीसोबत तो जसा वागतो आहे ते पाहून तुम्हाला अंदाज आलाच असेल असेही ती म्हणाली.

बालिका वधू या मालिकेतून शीतलला ओळख मिळाली होती. या मालिकेत तिने गहना नावाने एक भूमिका साकारली होती. तिने अनेक म्युजिक व्हिडीओमध्ये देखील काम केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या