लगीनघाई, ही अभिनेत्री रचणार स्वयंवर

2938

सध्या चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेते अभिनेत्री यावर्षी बोहल्यावर चढणार आहेत. मात्र एक अभिनेत्री अशीही आहे जी लग्नासाठी स्वयंवर रचणार आहे. त्यासाठी कलर्स वाहिनी एक खास कार्यक्रम सुरू करणार असून त्यात ही अभिनेत्री हजारो स्पर्धकातून तिचा भावी पती निवडणार आहे.


View this post on Instagram

❤️ #shehnaazgill #biggboss13 @colorstv @goldmediaa

A post shared by Shehnaaz Shine (@shehnaazgill) on

सध्या बिग बॉसच्या घरात असलेली पंजाबी अभिनेत्री, गायिका शेहनाज गिल ही घरातून बाहेर आल्यानंतर लग्नासाठी मुलगा शोधणार आहे. त्यासाठी ती स्वयंवर रचणार आहे. हे स्वयंवर राखी सावंत व राहुल महाजन यांच्या स्वयंवर सारखेच असणार आहे. हा कार्यक्रम देखील कलर्स वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

शेहनाज गिल ही गेल्या चार महिन्यांपासून बिग बॉसच्या घरात आहे. ती या घरातील सर्वात जास्त आवडली गेलेली स्पर्धक आहे. अगदी कमी वेळात शेहनाजची फॅन फॉलोईंग मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सलमान खान याने शेहनाजला ‘पंजाबची कतरिना कैफ’ म्हटले आहे. या कार्यक्रमात शेहनाजची सध्या सिद्धार्थ शुक्लासोबत जवळीक दाखवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या