कोपरगावात शेख-पठाण भिडले; 8 जखमी, 30 जणांविरुद्ध गुन्हे दाखल

608

कोपरगाव शहरातील इंदिरानगर भागात लग्नात झालेल्या भांडणाच्या कारणावरुन कुरापत काढून शेख कुटुंबात 17 फेब्रुवारी रोजी सोमवारी रात्री 9.30 वाजता दोन गटांनी एकमेकांवर चाल करून मारहाण केली. मारहाणीत लाकडी दांडके व दगडांचा वापर केला. या प्रकरणी 25 ते 30 जणांवर कोपरगांव शहर पोलीस ठाण्यात दोन गटातून परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेत 15 जण जखमी झाले आहेत. सदर घटनेनंतर परिसरात तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानंतर वातावरण निवळले.

यासंबंधी इंदिरानगर कोपरगांव येथील शमिना कलिम शेख हिने दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, आम्ही घरात जेवण करीत असता नाशिम शौकत पठाण, युनूस पाशु शेख, अफताब आयुब शेख, शौकत यासिम पठाण, आयुब पाशु शेख, रफिक पाशु शेख, जाफर आयुब शेख, फैजल आयुब शेख, शानु शौकत पठाण, तायरा युसूफ शेख, फरिदा आयुब शेख, सोमय्या रफिक शेख, बीबी शौकत पठाण, मुनती पाशु शेख (सर्व रा.इंदिरानगर) यांनी हातात लाकडी दांडके व दगडे घेवून आले व आमच्या घरावर दगडफेक केली व आमच्या घरात घुसून घाणेरड्या शिव्या दिल्या व धमकी देत वरील लोकांनी मला व माझे पती कलिम, भावजय सना, मुलगा नाजिम, कासिम यांना लाकडी दांड्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

तर दुसर्‍या घटनेत युनूस पाशु शेख यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत कलिम अब्दुल शेख, शमीना कलिम शेख, नदिम कलिम शेख, कासिम कलिम शेख, सोनु कलिम शेख, अरबाज कलिम शेख, मुलांबी याकुब शेख, बशीरा याकुब शेख, सुलतान याकुब शेख, सना सुलतान शेख, याकुब शेख व इतर 7 ते 8 जणांनी 15 फेब्रुवारी रोजी झालेल्या लग्नातील भांडणाचे कारणावरून वाद करुन लाकडी दांड्याने दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी युनूस शेख, भाऊ रफिक, भावजयी सुमैय्या हे जखमी झाले. अकिल शेख, किरण शिंदे, अजिज शेख वगैरेंनी हे भांडण सोडवले. या प्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी दोन फिर्यादी दाखल झाल्या आहेत. पोलीस निरीक्षक राकेश मानगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली पो.ना.बी एस कोरेकर पुढील तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या