… म्हणून शिखरची अनुपस्थिती हिंदुस्थानला बोचणार, वाचा आकड्यांचा खेळ

13

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आयसीसी क्रिकेट स्पर्धा रंगात आली असताना बुधवारचा दिवस टीम इंडियासाठी वाईट बातमी घेऊन आला. फॉर्मात असलेला सलामीवीर खेळाडू शिखर धवन दुखापतीमुळे वर्ल्डकपमधून बाहेर फेकला गेला आहे. शिखर धवनच्या जागी डावखुरा फलंदाज ऋषभ पंत घेणार आहे. स्पर्धा मध्यावर आली असतानाच भरवशाचा खेळाडू संघातून बाहेर गेला आहे. शिखर धवनचे आयसीसीच्या स्पर्धांमधील कामगिरी पाहिली तर त्याची अनुपस्थिती टीम इंडियाला बोचणार आहे.

आयसीसीच्या स्पर्धांमध्ये शिखरची कामगिरी –

  • 2013 ची चॅम्पियन्स ट्रॉफी – 90.75 च्या सरासरीने 363 धावा
  • 2014 आशिया चषक – 48 च्या सरासरीने 192 धावा
  • 2015 चा वर्ल्डकप – 421 धावा
  • 2017 ची चॅम्पियन्स ट्रॉफी – 338 धावा
  • 2018 आशिया चषक – 342 धावा

शिखर धवनच्या गेल्या पाच ते सहा वर्षातील कामगिरी पाहिली तर आयसीसीच्या महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये त्याने दमदार कामगिरी केली आहे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतही ऑस्ट्रेलियाविरुद्ध शिखरने 117 धावांची दणदणीत खेळी केली होती. याच लढतीत त्याच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यावेळी शिखर 12 ते 15 दिवसात संघात पुनरागमन करेल असा विश्वास फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी व्यक्त केला होता. परंतु बुधवारी मात्र बीसीसीआयने तो आगामी लढतींमध्ये खेळताना दिसणार नाही हे जाहीर केले.

आपली प्रतिक्रिया द्या