हाणामारीच्या दृश्याचे चित्रीकरण करताना शिल्पा शेट्टी जखमी

shilpa-shetty-1

रोहीत शेट्टी याच्या आगामी अॅक्शनपॅक वेबसिरीजच्या शूटींगदरम्यान अभिनेत्री शिल्पा शेट्टी जखमी झाली आहे. शिल्पाच्या पायाला दुखापत झाली असून तिचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. शिल्पाने इंस्टाग्रामवरून याबाबतची पोस्ट व तिचा फोटो शेअर केली आहे. या फोटोत शिल्पाच्या पायाला भलं मोठं प्लास्टर दिसत आहे.

गेल्या वर्षी शिल्पा शेट्टीने तब्बल 13 वर्षानंतर हंगामा 2 या चित्रपटातून पुनरागमन केलं. सध्या ती रोहीत शेट्टी याच्या इंडियन पोलीस फोर्स या वेब सिरीजसाठी शूटींग करत होती. त्याच वेबसिरीजच्या सेटवर हा अॅक्शन सिन करताना तिला अपघात झाला. ही वेब सिरीज 8 एपिसोडची असून अॅमेझ़ॉन प्राईमवर रिलीज होणार आहे.