ठाण्यात शिंदे गटाला खिंडार असंख्य कार्यकर्त्यांच्या हाती शिवबंधन

ठाण्यात आज शिंदे गटाला मोठे खिंडार पडले. कोपरीतील शिंदे गटाचे उपविभागप्रमुख रामचंद्र पिंगुळकर ऊर्फ आबा मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्री निवासस्थानी झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या सर्वांना शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले.

शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर आणि युवासेना राज्य विस्तारक राजेश वायाळ-पाटील यांच्या पुढाकाराने कोपरीतील शिंदे गटाचे उपविभागप्रमुख रामचंद्र पिंगुळकर उर्फ आबा मोरे, सदाराम पवार, सुरेश नाईक, सदाशिव गावडे, संभाजी केल, अशोक खांडेकर, गंगाराम कदम, रवींद्र साबळे, संतोष सावंत, विनायक मोरे, सुनील देसाई, राजेंद्र जांबुळकर, तुळशीदास तायडे, उमाकांत तांदळे, दिनेश साळवे, दलित पँथरचे ठाणे सचिव करण भंडारे, शिंदे गटाचे विक्की घोडके, आशिष महाडिक, पंकज कांबळे, राजेश डोंगरे, पंढरीनाथ डोंगरे, रितेश कळझुणकर, फारुक सय्यद, संतोष पवार, अजित देसाई, सुनीता देसाई, सुनील बोरकर, अनिल बोरकर, नूतन बोरकर, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवा नाईक, नीरज दाभाडे, गणेश जाधव, सिद्धांत गायकवाड, तुषार कात्रज यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, उपनेत्या किशोरी पेडणकर, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, उपजिल्हाप्रमुख कृष्णकांत कोळी, युवासेना विस्तारक राजेश वायाळ उपस्थित होते.

बालेकिल्ला अबाधित राखा – उद्धव ठाकरे

‘ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तो अबाधित राहिला पाहिजे. शिवसेनेची मशाल धगधगत रहायला हवी आणि भगव्याचे पावित्र्य कायम ठेवले पाहिजे. काहीजण भगव्या रंगावर वेगवेगळी चित्रे, पोस्टर लावत जनतेची दिशाभूल करत आहेत. शिवसेना ही भगव्याची, हिंदुत्वाची मशाल आहे. शिवसेनाप्रमुखांची तेजाची मशाल आपण पुढे घेऊन जाऊ’, असे आवाहनही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केले.