
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्यभरातील सरकारी कर्मचारी गेल्याकाही दिवसांपासून आंदोलन करत आहेत. मात्र मिंधे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची संपकरी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर निरनिराळे आरोप केले आहेत.
“सरकारी कर्मचारी आठवड्यातून 5 दिवसच काम करतात. ते पेन्शनसाठी आंदोलन करत आहेत. मात्र दुसरीकडे राज्यातील बेरोजगार तरुण अर्ध्या पगारावर काम करायला तयार आहेत. सरकारी कार्यालयात गेल्यावर किती कर्मचारी कामावर हजर भेटतात?” असा आरोप गायकवाड यांनी केला.
यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत ते म्हणाले की, “हे ….. निराधार बायकांच्या केसेस मंजूर करायचे पैसे मागतात. शेतकऱ्यांकडून पैसे मागतात. भ्रष्टाचार करण्याची हद्द झाली. 95 टक्के सरकारी कर्मचाऱ्यांना बाहेरची कमाई असते.”
“शेतकऱ्यांचे मृत्यू रोजच होत असतात. कोणीही असो शेवटी मृत्यू हे अंतिम सत्य आहे. या आधीच्या आमदारांनी काहीच दिलं नाही. आता मी मदत करतो तर माझ्याकडे दोन दोन कोटी मागत आहेत. आधीच्या आमदारांकडून पाच लाख सुद्धा मिळत नव्हते. मुख्यमंत्री सगळ्या मागण्या मान्य करतात म्हणूनच या कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु झालं. तसेच आता बाकी लोकांच्या देखील अपेक्षा वाढल्या आहेत.” असे विधान गायकवाड यांनी केले.