कुणी ताकद दिल्याशिवाय शिंदे धाडस करणार नाही!

सध्या राज्यात जे राजकारण चालले आहे हे शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचे दिसत असले तरी यामागे कोणती तरी मोठी शक्ती आहे. त्यामुळे हे सगळे घडतेय असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ‘कुणी तरी ताकद देत असल्याशिवाय एकनाथ शिंदे इतके धाडस करणार नाही. भविष्यात कोण त्यांच्या पाठीमागे आहे हे समोर येईल,’ असे सूचक विधान राष्ट्रवादीचे नेते व विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी कल्याणमध्ये झालेल्या सत्कार समारंभात केले आहे. कल्याण-डोंबिवलीत जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस व खान्देश संघटनांतर्फे एकनाथ खडसे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी खडसे बोलत होते.