
‘शिर्डी के साई बाबा’ या चित्रपटातून लोकप्रियता मिळवणारे ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. त्यांच्यावर सध्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मागील काही काळापासून सुधीर दळवी हे सेप्टिक इन्फेक्शन झाल्याने गंभीर आजारपणाशी झुंज देत आहेत. या गंभीर आजारातून ते लवकर बरे होतील, अशी प्रार्थना चाहते करत आहेत.
86 वर्षीय अभिनेते सुधीर दळवी यांच्या उपचारांसाठी 15 लाख रुपये इतक्या मोठय़ा रकमेची आवश्यकता आहे. त्यांच्या कुटुंबाला एवढी मोठी रक्कम एकाच वेळी जमा करणे शक्य नसल्याने त्यांनी आता चित्रपटसृष्टीतील लोकांना आणि चाहत्यांना मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन केले आहे.
































































