पुण्यतिथी उत्सवकाळात साईचरणी चार कोटींचे दान

569

श्री साईबाबांच्या 101व्या पुण्यतिथीनिमित्ताने साईबाबा संस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित पुण्यतिथी उत्सवाच्या चार दिवसांच्या कालावधीत सव्वादोन लाख भाविकांनी साईंचे दर्शन घेतले असून, चार कोटींचे दान साईचरणी अर्पण केल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.

मुगळीकर म्हणाले, श्री पुण्यतिथी उत्सवात सःशुल्क व ऑनलाइन पासद्वारे एकूण 57 लाख 43 हजार 800 रुपये देणगी प्राप्त झाली आहे. दानपेटीतून 1 कोटी 73 लाख 85 हाजर 416 रुपये, देणगी काउंटरद्वारे 91 लाख 3 हजार 474, डेबिट, क्रेडिट कार्ड, ऑनलाइन देणगी, चेक डीडी, मनी ऑर्डर आदींद्वारे 1 कोटी 8 लाख 76 हजार 450 रुपये देणगी रक्कम स्वरूपात प्राप्त झालेली आहे. 12 लाख 67 हजार रुपये किमतीचे 375.930 ग्रॅम सोने व 83 हजार रुपये किमतीची 3110.350 ग्रॅम चांदी आणि सुमारे 19 देशांमधून परदेशी चलनाद्वारे 4 लाख 70 हजार 903 रुपये देणगी प्राप्त झालेली आहे. भिक्षा झोळीत गहू, तांदुळ, बाजरी, ज्वारी, गुळ व खाद्यतेल आदी 2 लाख 61 हजार 529 रुपयांचे साहित्य व 65 हजार 72 रुपये रोख रक्कम अशी एकूण 3 लाख 26 हजार 601 रुपये अशी एकूण 3 कोटी 95 लाख 12 हजार 844 रुपये देणगी प्राप्त झाली असल्याचे मुगळीकर यांनी सांगितले.

 श्री साई प्रसादालयात उत्सवकाळात 2 लाख 5 हजार 735 साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला व 43 हजार 422 साईभक्तांनी अन्नाच्या पाकिटांचा लाभ घेतला. याबरोबरच 1 लाख 2 हजार 168 लाडू पाकिटांची विक्री करण्यात आली असून, याद्वारे 25 लाख 54 हजार 200 रुपये प्राप्त झाले आहेत. तसेच, दर्शनरांगेतून 2 लाख 17 हजार 200 मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचे साईभक्तांना वाटप करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या