शिर्डीच्या साईचरणी 36 लाखांचा सोन्याचा मुकूट, चांदीच्या ताट    

( शिर्डी ) शिर्डीच्या साईबाबांना सोन्याची आभुषणे देण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असून आंध्रप्रदेशाकील बापटला येथील दानशुर साईभक्‍त अन्‍नम सतिष प्रभाकर यांनी 770 ग्रॅम वजनाचा 36 लाख 98 हजार 310 रुपये किंमतीचा सोन्‍याचा मुकुट आणि 620 ग्रॅम वजनाचे 33 हजार 480 रुपये किंमतीचे चांदीचे ताट साईचरणी अर्पण केलय. सदरची देणगी संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांना सुपूर्द करण्यात आलीय.