शिरूर – कालव्यात कार कोसळून एकाच कुटुंबातील दोन तरुणांचा जागीच मृत्यू

959

शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमालाजवळ चासकमान कालव्यामध्ये चारचाकी कोसळून दोघांचा जागीच मृत्यू झाला. लखन भानुदास रासकर (26) बापु बाळु रासकर (35) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही अण्णापूर येथील रहिवासी होते. ही घटना मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्रीच्या सुमारास शिक्रापूर-मलठण रस्त्याने चाललेली चारचाकी नियंत्रण सुटल्याने चासकमान कालव्यात कोसळली. या अपघातात लखन रासकर आणि बापू रासकर हे दोघे ठार झाले. दोघेही एकाच कुटुंबातील असल्याची माहिती मिळत आहे. एकाच कुटुंबातील दोन तरुणांचा अपघातात मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या