आयुर्विद्या प्रसारक मंडळाच्या आयुर्वेद महाविद्यालय शीव या महाविद्यालयाचे ‘नक्षत्र 2024’ हे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच महाविद्यालयामध्ये पार पडले. वर्षभरात आयोजित शैक्षणिक, सांस्पृतिक आणि क्रीडा स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
महाविद्यालयातील जे माजी विद्यार्थी प्रशासकीय सेवेत उच्च पदांवर कार्यरत आहेत अशा विद्यार्थ्यांचा कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात सत्कार समारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनदेखील केले. दुसऱया सत्रात पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी वैद्य सावंत, वैद्य शाम नाबर, वैद्य पाताडे व सभासद उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विश्वस्त मंडळातील वैद्य अशोक मांजरेकर, वैद्य दिलीप लोखंडे यांनी परिश्रम घेतले.
संपूर्ण वर्षभर कार्यक्रम चांगल्या प्रकारे साजरे केल्याबद्दल विद्यार्थी प्रतिनिधी सुशील उतकर व वैभव सोनार यांनी सर्व विश्वस्त मंडळाचे, प्राचार्य वैद्य रविदास मोरे, उपप्राचार्या वैद्य अनया पाथरीकर, वैद्य शीला कोहाड तसेच विद्यार्थी मंडळातील शिक्षक प्रमुख वैद्य अनया पाथरीकर, सांस्पृतिक विभागप्रमुख वैद्य प्रिया वालवटकर व वैद्य प्रवीण पाटील, एनएसएस प्रमुख वैद्य सूर्यभान डोंगरे, क्रीडा विभागप्रमुख वैद्य संजय पाईकराव व वैद्य पंकज ताथेड तसेच विद्यार्थी मंडळातील सांस्पृतिक प्रमुख अयाज खान व पल्लवी खेत्रे, क्रीडा प्रमुख अदिती फुले यांचे अभिनंदन केले. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले विनोदी अभिनेते अरुण कदम यांचादेखील यावेळी सत्कार करण्यात आला.