शिवभोजनासाठी आधार कार्डची सक्ती नाही

640

राज्यात 26 जानेवारी रोजी सुरू होणारी ‘शिवभोजन’ योजना ही गरीब व गरजू व्यक्तींसाठी आहे. यासाठी आधार कार्डची सक्ती करण्यात आलेली नाही. शिवभोजन केंद्रावर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देऊन या योजनेचा लाभ देण्यात येईल, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

‘शिवभोजन’ योजनेंतर्गत सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर राज्यात प्रत्येक जिह्याच्या मुख्यालयी व महानगरपालिका क्षेत्रात किमान एक भोजनालय सुरू करण्यात येणार आहे. हे भोजनालय वर्दळीच्या ठिकाणी असेल. ही भोजनालये दुपारी 12 ते 2 या कालावधीत सुरू राहतील. या वेळेत या भोजनालयात योजनेच्या लाभार्थ्यांसाठी राखीव जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी भोजनालय चालकाची असल्याचे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

– भोजनालय चालविण्यासाठी या मालकाकडे स्वतःची पर्याप्त जागा असावी. भोजनालयात एका वेळी किमान 25 व्यक्तींची जेवणासाठी बसण्याची व्यवस्था असेल.

– एका भोजनालयात किमान 75 आणि कमाल 150 थाळी भोजन उपलब्ध होणार आहे. या भोजनालयात बाहेरचे जेवण घेऊन येण्यास व भोजनालयातील जेवण बाहेर घेऊन जाता येणार नाही.

– शासकीय कर्मचाऱ्यांना तसेच ज्या ठिकाणी ही योजना राबविण्यात येईल त्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्य़ांना सवलतीच्या दराने जेवण्यास सक्त मनाई असेल.

आपली प्रतिक्रिया द्या